AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंवरुन रोहित पवार यांचा स्फोटक दावा! म्हणाले...

एकनाथ शिंदेंवरुन रोहित पवार यांचा स्फोटक दावा! म्हणाले…

| Updated on: Mar 05, 2026 | 9:40 AM
Share

रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या २०२३ मधील दावोस भेटीदरम्यान घडलेल्या कथित विमान धमकी प्रकरणावरून व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, अजित पवारांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील त्रुटींवर बोट ठेवत, एटीसीच्या परवानगी व अपघाताच्या क्रिमिनल अँगलची सीआयडी चौकशीची मागणी केली आहे.

रोहित पवारांनी व्हीएसआर विमान कंपनीशी संबंधित दोन महत्त्वपूर्ण घटनांवरून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. २०२३ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला जात असताना, व्हीएसआर कंपनीच्या विमानाला इराण आणि इराकच्या हवाई हद्दीत परवानगीशिवाय प्रवेश केल्याने फायटर जेट्सनी पाडण्याची धमकी दिली होती, असा दावा पवारांनी केला आहे. परिणामी, विमान बहरीनला परतले आणि आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर पुढे गेले. पवारांनी यामागे व्हीएसआरची निष्काळजीपणा की कट असा सवाल केला आहे.

याव्यतिरिक्त, रोहित पवारांनी अजित पवारांशी संबंधित एका विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावरही शंका व्यक्त केली आहे. कमी दृश्यमानता असताना एटीसीने विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अहवालातील झाडांवर आदळल्याच्या नोंदीवरही त्यांनी आक्षेप घेतला, कारण अपघातस्थळी केवळ झुडपे होती असे त्यांचे म्हणणे आहे. या अपघातामागे क्रिमिनल अँगल असल्याची शक्यता वर्तवत, सीआयडी चौकशीची मागणी पवारांनी केली आहे.

Published on: Mar 05, 2026 09:40 AM
Follow Us