“अजूनही संधी, अजितदादा आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात,” रोहित पवार यांनी व्यक्त केली आशा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनी दगा दिला. काही आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं आहेत तर काही आम्ही शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचं सांगत आहेत. अशातच शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची आशा व्यक्त केली आहे.
मुंबई : अजित पवारांच्या या बंडामुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी फूट पडली आहे. सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निकटवर्तीयांनीही त्यांना दगा दिला. काही आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं आहेत तर काही आम्ही शरद पवार यांच्या पाठिशी असल्याचं सांगत आहेत. अशातच शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “माझाही तेच मत आहे की, अजितदादा यांनी शरद पवार साहेबांसोबत राहायला पाहिजे होतं, पण अजूनही ती संधी आहे. बघू काय होतंय ते. पण पुढे जे काही होईल त्यावर पवार साहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला स्वीकारावं लागेल.”
Published on: Jul 05, 2023 10:58 AM
Follow Us
Latest Videos
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
