RTO अधिकारी बजरंग खरमाटेंचे वकील ईडी कार्यालयात, किरीट सोमय्या सागंलीत दाखल
70 हजार पगार असणाऱ्या बजरंग खरमाटे कडे 270 कोटी रुपयांची संपत्ती आली कुठून ही बेनामी संपत्ती आहे कोणाची त्याची सर्व माहिती मी घेत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पासून अनिल परब याच्या मार्फत राज्यात लूट सुरू आहे, असा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
70 हजार पगार असणाऱ्या बजरंग खरमाटे कडे 270 कोटी रुपयांची संपत्ती आली कुठून ही बेनामी संपत्ती आहे कोणाची त्याची सर्व माहिती मी घेत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पासून अनिल परब याच्या मार्फत राज्यात लूट सुरू आहे, असा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. सचिन वाझे झाला पलांडे झाला आता अनिल परब आहे आणि मग शरद पवार यांच्या जितेंद्र आव्हाड याचा नंबर लावणार अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किरीट सोमय्या हे आज सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील चिखलहोल येथे बजरंग खरमाटे याच्या प्रथमेश कन्स्ट्रक्शन आणि पाईप कारखाना याना भेट देऊन संपूर्ण संपत्ती ची पाहणी आणि चौकशी करत आहेत. किरीट सोमय्य एकीकडे पाहणी करत असताना खरमाटे यांचे वकील ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?

