AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadabhau Khot गोव्याच्या निवडणूक रिंगणात | Goa Election | Sadabhau Khot At Goa

| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 7:40 PM
Share

महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को अशी परिस्थिती आहे. राऊतांना वाईनचा रोज डोस जास्त होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बोलत असतात त्यामुळे आता गुळाचे वाईन देखील राज्यात सुरू करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

गोवा : पाच राज्यात सध्या निवडणुकांचा प्रचार (Five State Election) अंतिम टप्प्यात आला आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्ष पायला भिंगरी बांधून प्रचारात उतरले आहेत. राज्यात भाजपचे सहयोगी असणारे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) गोव्यातही (Goa Elections 2022) भाजपच्या मदतीला पोहोचले आहेत. त्यांनी गोव्यातही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. वाझोट्यांना लेकरं होत नसतात म्हणत घणाघात केला आहे. त्यांनी गोव्यात संजय राऊतांचाही समाचार घेतला आहे. जनतेच्या मनामध्ये आहे जे केंद्रमध्ये सरकार आहे ते राज्यामध्ये असले पाहिजे, असे म्हणत गोव्यात बीजेपीची सत्ता येणार नाही असं म्हणणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रातील जनता संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. सौ चुहे खाके बिल्ली चली हज को अशी परिस्थिती आहे. राऊतांना वाईनचा रोज डोस जास्त होत असल्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते बोलत असतात त्यामुळे आता गुळाचे वाईन देखील राज्यात सुरू करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.