सांगलीत अंनिसकडून ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण’ उपक्रम
देशभरात चंद्रग्रहणाचे विलोभनीय दृश्य दिसले. या पार्श्वभूमीवर सांगलीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण उपक्रम राबवला. याअंतर्गत गर्भवती महिला चांदनी प्रफुल्ल थोरात यांनी ग्रहणकाळात भाजी चिरून आणि फळे खाऊन, बाळाच्या ओठांना फाटण्याची अंधश्रद्धा मोडून काढली. अंनिसच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खगोलप्रेमींसाठी आजची संध्याकाळ पर्वणी ठरली. देशभरातील विविध भागांमधून चंद्रग्रहणाचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमधून ग्रहणाचे खास व्हिडिओ समोर आले. टीव्ही स्क्रीनवर देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील ही दृश्ये दिसत होती, ज्यात चंद्राचा बदलणारा रंग आणि आकार स्पष्टपणे पाहायला मिळाला. वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी दिसले. गुवाहाटीमध्येही चंद्राचे विविध रंग पाहायला मिळाले.
याचवेळी, महाराष्ट्रातील सांगली येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ने सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत एका गर्भवती महिलेने ग्रहणकाळात भाजी चिरली आणि फळे खाल्ली. ग्रहणकाळात गर्भवती महिलेने भाजी चिरल्यास बाळाचे ओठ फाटतात, या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला चांदनी प्रफुल्ल थोरात या गर्भवती महिलेने छेद दिला. अंनिसच्या या वैज्ञानिक आणि जनजागृतीपर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Published on: Mar 04, 2026 10:16 AM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
