22 जागा, शिंदे गट गंमत करतंय, इतके उमेदवार आहेत का? ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट सवाल कुणाला?
शिंदेंच्या शिवसेनेने 22 जागा लढण्यावरून दावा करणार आहेत. या दाव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी टीका केली आहे.शिंदे गटाचे नेते 22 जागा लढण्याबाबत गंमत करत असतील, असा टोला संजय पवार यांनी लगावला आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना देखील 22 जागांवर दावा करणार असल्याची चर्चा आहे. मविआने सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन जागेवर दावा केला आहे. “महाविकास आघाडी ही शेवटपर्यंत एकत्र लढण्यासाठी केली आहे. हुकूमशाहीच दादागिरीचं, दडपशाहीच सरकार देशभरात आतापर्यंच्या इतिहासात पाहिलं नव्हतं. यांना थांबवलं नाही तर लोकशाही धोक्यात येईल.कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा आतापर्यंत ठाकरे गटाने लढल्या आणि जिंकल्या आहेत.आमचा दावा या दोन्ही जागांवर आहे.या जागेवर शिवसेनेला मतदान झालं आहे.त्यामुळे दोन्ही मतदारसंघ आम्हाला मिळाले पाहिजेत असं आमचा उद्धव ठाकरेंकडे आग्रह असेल”. दरम्यान शिंदे गटाचे नेते 22 जागा लढण्याबाबत गंमत करत असतील, असा टोला संजय पवार यांनी लगावला आहे.
Published on: May 26, 2023 02:42 PM
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
