Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल, राऊत यांच्या अडचणीत वाढ
आज अचानक ईडीचं पथक थेट खासदार संजय राऊतांच्या घरी पोहोचल्यानं राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी किती काळ चालेल याबाबत माहिती नाही.
मुंबई : ईडीने काही दिवसांपूर्वी राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. दरम्यान, आज शिवसेना (Shiv sena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ईडीचं (ED)पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या सुरक्षा रक्षकांनी राऊत यांच्या घराबाहेर पहारा सुरू ठेवला असून कुणालाही आत जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यानंतर आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, राऊत यांच्या घरी ईडीची चौकशी किती काळ चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.
Published on: Jul 31, 2022 09:27 AM
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..

