Sanjay Raut: 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर सुरु आहे- संजय राऊत
गेली 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर अविरत सुरू आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. लाउडपीकर आणि भाडोत्री भोंग्यांमध्ये फरक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या लाऊडस्पिकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश शिवसेनेच्या मागे निष्ठेने आणि जिद्धीने उभा आहे असे राऊत म्हणाले. एक महिन्यानंतरही एक दुजे के लिये सिनेमाची स्क्रिप्ट सुरु असल्याचे […]
गेली 56 वर्षे शिवसेनेचा लाऊडस्पीकर अविरत सुरू आहे असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. लाउडपीकर आणि भाडोत्री भोंग्यांमध्ये फरक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या लाऊडस्पिकरवरचा संदेश आणि गर्जना ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि देश शिवसेनेच्या मागे निष्ठेने आणि जिद्धीने उभा आहे असे राऊत म्हणाले. एक महिन्यानंतरही एक दुजे के लिये सिनेमाची स्क्रिप्ट सुरु असल्याचे संजय राऊत म्हणाले. शिंद- भाजप सरकार शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये वाहून जाणार असेही ते म्हणाले. आदित्य ठारेंच्या शिवसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद काहींना धडकी भागविणारा आहे असेही यावेळी संजय राऊत म्हणाले.
Published on: Jul 24, 2022 11:58 AM
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..