‘त्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? मर्द असशील तर….’, टीका करणाऱ्या मनसे नेत्याला मिटकरींचा इशारा
'दुनबळेंने माझ्या हत्येचा कट रचला. त्याला अटक करावी नाही तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल. अमोल मिटकरी वर हल्ला करण्याची त्यांची लायकी नाही. हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्च्याला समोरे जा', अमोल मिटकरींनी मनसे नेत्यांच्या इशाऱ्यावर प्रत्युत्तर दिलं.
मनसे नेता कर्णबाळा दुनबळे हा मुख्य आरोपी आहे. त्याने चेतावणी दिली आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले. कर्णबाळा दुनबळेंवर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर कर्णबाळ फरार झाला. जर तुम्ही मर्द असाल तर पोलिसांसमोर या आणि शरण जा… अशा प्रकारे वक्तव्य करत असेल तर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली पाहिजे…कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल असं पोलिसांनी वागू नये, असेही मिटकरी म्हणाले. दुनबळेंने माझ्या हत्येचा कट रचला. त्याला अटक करावी नाही तर कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल. अमोल मिटकरी वर हल्ला करण्याची त्यांची लायकी नाही. हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोर्च्याला समोरे जा, असा थेट इशाराच पोलीस प्रशासनाला दिला. दुनबळेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? यांनी मोगलाई माजवण्याचा प्रयत्न करू नये, शेपटी नसलेल्या प्राण्याला अमोल मिटकरी पुरून उरलाय, असा इतिहास असल्याचे म्हणत मिटकरींनी कर्णबाळा दुनबळेंना इशारा दिला आहे.
जो देश शक्तिशाली असतो, तोच जगात शांतता निर्माण करू शकतो - CM फडणवीस
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकुलता एक मुलगा गमावला, हतबल आईला....
आदिती तटकरेंचे सचिव महिलांसोबत अर्वाच्च भाषेत... रोहिणी खडसेंचा खळबळजन
आम्ही घरी जाऊन पाठिंबा दिला म्हणून तुम्ही मुख्यमंत्री बनलात...
