Special Report | नाना पटोलेंचा थेट शरद पवारांशी पंगा ?
मते तिकीट वाटप करताना निवडणुकीत आणि सरकार चालविण्यासाठी आम्ही त्याग केला मात्र आम्ही वारंवार त्याग करणार नाही आणि व्याजासकट त्या त्यागाची किंमत वसूल करू असेही पवार म्हणाले.
चंद्रपूर : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी आज जिल्ह्यातील मूल येथील पहिल्या जाहीर सभेत काँग्रेसबाबत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. मूल येथे तालुका क्रीडा संकुल मैदानावर बोलताना त्यांनी आगामी निवडणूकीत मित्रपक्षांकडून जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे संकेत दिले. त्यांच्या मते तिकीट वाटप करताना निवडणुकीत आणि सरकार चालविण्यासाठी आम्ही त्याग केला मात्र आम्ही वारंवार त्याग करणार नाही आणि व्याजासकट त्या त्यागाची किंमत वसूल करू असेही पवार म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात दौरा करताना ‘राष्ट्रवादीचे दुकान बंद करू’ अशी भाषा केली होती. त्याला पवारांनी दिलेले उत्तर समजले जात आहे.
Latest Videos
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
