Special Report | नेमकं कोण कोणाचं डोकं तपासणार आहे ?
देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.
नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षाकडून एकप्रकारे आनंदोत्सव साजरा होतोय. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका-टिप्पणीही सुरु आहे. दरम्यान, चंद्रकात पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत व्यक्त केली. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटलांना टोला लगावला. आता पाटलांनीही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. त्यावर बोलताना ते निम्मे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याकडेच आता जातो. अलीकडे ते आणि नवाब मलिक काहीही बोलतात. त्यांनी माझी मानसिकता तपासावी आणि मी त्यांचं डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी आहे.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
