मतदारांचा अपमान अन् XX असा उल्लेख, संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
निवडणुकीवेळी हा भाऊ बहिणीला ओवाळणी टाकणार, अहोरात्र काम करणार म्हणून अजित पवार यांनी मतदारांपुढे मतांचा जोगावा मागितला होता. निकालानंतर तुम्ही मतं दिलीत म्हणून तुम्ही मालक नाही झालात, अशी उर्मट भाषा...
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांसाठी वापरलेले शब्द आता वादात आलेत. नेत्यांनी एकमेकांना शिव्या-शाप दिल्यानंतर आता महाराष्ट्रातील नेत्यांनी फक्क मतदारांनाच शिव्या देण्याची काय ती कसर शिल्लक ठेवली होती, त्याचीच पूर्तता आता शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या जीभेच्या धारेनं पूर्ण करून टाकली. संजय गायकवाड निवडणून आले असते तरी त्यांच्या मनात कमी मताधिक्यानं नाराजी आहे. हीच नाराजी त्यांनी भरसभेतून बोलून दाखवली. ज्या जनतेचा कैवार घेऊन आमदारकीची शपथ घेतली त्याच्याच समोर गायकवाडांच्या जीभेने दलाल आणि वेश्यांच्या पिंजऱ्यात उभं केलं., तर दुसरीकडे पुण्यात अजित पवार यांनी जमलेल्या लोकांचा पाणउतारा केला. निवडणुकीवेळी हा भाऊ बहिणीला ओवाळणी टाकणार, अहोरात्र काम करणार म्हणून अजित पवार यांनी मतदारांपुढे मतांचा जोगावा मागितला होता. निकालानंतर तुम्ही मतं दिलीत म्हणून तुम्ही मालक नाही झालात, अशी उर्मट भाषा अजित पवारांनी केली. गरज सरो अन् वैद्य मरो… ही म्हण सर्वच राजकीय नेत्यांना कमी-अधिक फरकाने लागू होते. प्रचाराच्या कंबर दुखीपर्यंत पाया पडणारे नम्रतेचा आव आणून नमस्कार करणारे हे हातच मतदारांकडे वेश्या म्हणून बोट दाखवताय.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

