नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी यांच्या संदर्भात नवा मोठा खुलासा
VIDEO : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणात नागपूर पोलिसांनी केलेल्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड, काय आहे अपडेट बघा...
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारी याची नागपूर पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्याच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. अशातच नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी यांच्या संदर्भात नवा मोठा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. जयेश पुजारी याने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री के एस इश्वरप्पा यांच्या हत्येची सुपारी घेतली होती, अशी माहिती नागपूर पोलीस यांनी केलेल्या चौकशीतून उघड झाली आहे. इतकेच नाही तर जयेश पुजारी याने कर्नाटकातील काही शहरात दहशतवादी नेटवर्क उभारलं होतं. यासह त्याने बेळगावमधील तुरूंगातून सुटका झालेल्या साथीदाराला त्याने शस्त्र खरेदीसाठी पैसे दिल्याची माहिती चौकशीतून समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Published on: Apr 14, 2023 08:42 AM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
