AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर अनिल देशमुख आणि अनिल परब?

Special Report | किरीट सोमय्यांच्या टार्गेटवर अनिल देशमुख आणि अनिल परब?

| Edited By: sagar joshi | Updated on: Sep 06, 2021 | 10:24 PM
Share

ठाकरे यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा, असा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांचे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच आहे. सोमय्या यांनी आज बजरंग खरमाटे यांच्या सांगली आणि तासगावमधील मालमत्तांची पाहणी केली. त्यावेळी अनिल परब यांची बेनामी संपत्ती खरमाटे यांच्या नावावर असल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय. आरटीओ अधिकारी खरमाटे हे अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. या पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या यांनी खरमाटे यांच्या सांगतीलील मालमत्तांची पाहणी केली आणि पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला थेट इशाराच केलाय.

ठाकरे सरकारची लूट, बेनामी कारभारात अजून एक नाव आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे 19 बेनामी बंगले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार हे बेनामी सरकार आहे. ठाकरे यांचं इलेव्हन सरकार आणि उद्धव ठाकरेंसह 12 जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार, असा इशारा सोमय्या यांनी दिलाय. आम्ही ठाकरे यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आम्ही घोटाळे केले असतील तर चौकशी करा. अनिल परब प्रकरण आता सुरु आहे, भावना गवळी पुढच्या आठवड्यात आणि जितेंद्र आव्हाड तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्हीही बॅग भरा, असा थेट इशाराच सोमय्या यांनी दिला आहे.

Follow Us