Special Report | पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार ? कार्यकर्त्यांची इच्छा पंकजा पूर्ण करणार ?

भाजपमध्ये पंकजा यांची अवस्था खडसे यांच्यासारखी केली जात आहे. त्यामुळे त्यांनी शिवधनुष्य हाती घ्यावं असं कार्यकर्ते म्हणत आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी मात्र सध्या तो विषय नाही. आता महाराष्ट्र संकटात आहे. लोकांना संकटातून बाहेर काढण्यावर भर दिला पाहिजे असं भाष्य केलंय.

विधानसभा आणि विधान परिषद निवडणूक, तसंच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापासून पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातही काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु असते. अशावेळी पंकजा यांच्या समर्थकांनी आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावं अशी मागणी केलीय. भाजपमध्ये पंकजा यांची अवस्था खडसे यांच्यासारखी केली जात आहे. त्यामुळे त्यांनी शिवधनुष्य हाती घ्यावं असं कार्यकर्ते म्हणत आहे. त्यावर पंकजा मुंडे यांनी मात्र सध्या तो विषय नाही. आता महाराष्ट्र संकटात आहे. लोकांना संकटातून बाहेर काढण्यावर भर दिला पाहिजे असं भाष्य केलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI