AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | जाणून घ्या कोणत्या जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता?

Special Report | जाणून घ्या कोणत्या जिल्हा परिषदेत कुणाची सत्ता?

| Edited By: sagar joshi | Updated on: Oct 06, 2021 | 9:14 PM
Share

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फारशी चमक दाखविण्यात आलेली नाही.

राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फारशी चमक दाखविण्यात आलेली नाही.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अपवादात्मक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती. मात्र, एकंदरीत सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपआपलं बळ दाखवलं होतं. जिल्हा परिषदेच्या 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवून आपणच राज्यात नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. तर काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17, शिवसेनेने 12 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविल आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 46, भाजपने 23 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविला आहे.

पालघरमध्ये 15 जागांपैकी शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीला चार आणि इतरांना एका जागेवर विजय मिळाला आहे. पालघरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. पालघरमध्ये शिवसेनेच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीच्या तीन जागा कमी झाल्या आहेत. भाजपच्या एका जागेत वाढ झाली आहे. तर माकपने त्यांची एक जागा कायम राखली आहे. मात्र, शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा पराभव झाल्याने ही निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली आहे.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या