Video : गद्दार म्हणण्यापेक्षा सुसंस्कृत विरोधीपक्ष कसा असतो दाखवून द्या- सुधीर मुनगंटीवार
शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा सुसंस्कृत विरोधीपक्ष भूमिका पार पाडा- मुनगंटीवार
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचं बंड, राज्यात झालेलं सत्तांतर यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत (Udhhav Thackeray Interview) झाली. सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही मुलाखत घेतली. आज त्याचा एक भाग प्रसिद्ध झालाय. त्यावर भाजपकडून सडकून टीका करण्यात आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी या मुलाखतीतील मुद्दे खोडून काढले आहेत. तुम्ही म्हणता सुसंस्कृत विरोधी पक्ष हवा. तर मग तेच सिद्ध करण्याची वेळ आली आहे. शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हणण्यापेक्षा सुसंस्कृत विरोधीपक्ष भूमिका पार पाडा, असं मुनगंटीवार म्हणालेत. बाळासाहेबांच्या नावाऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा एकदा सुनावलं. त्यावर 2019 ला निवडणुकीवेळी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पोस्टरवर लावून मतं मागितली तेव्हा ते तुमचे वडील होते का?, असा सवाल मुनगंटीवारांनी विचारला आहे.
Published on: Jul 26, 2022 11:55 AM
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत

