SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 July 2021
बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास 20 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) याबाबत आज अॅलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर मुंबई शहर व उपनगरासाठी चार दिवस ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी केला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केला आहे.
बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी, मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय झाले आहेत. जवळपास 20 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आज वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी, विभागांसाठी अॅलर्ट जारी केला आहे.
Published on: Jul 12, 2021 08:48 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

