मनमिळावू स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड; सुप्रिया सुळे यांच्याकडून गिरीश बापट यांना श्रद्धांजली
Girish Bapat Passed Away : भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. बापट यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केलाय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाहा व्हीडिओ...
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर सर्व पक्षातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.भावपूर्ण श्रद्धांजली!”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Published on: Mar 29, 2023 04:08 PM
Latest Videos
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?

