VIDEO: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उद्या शस्त्रक्रिया होणार
उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान शस्त्रक्रिया होईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान शस्त्रक्रिया होईल. डॉ. शेखर भोजराज यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांनी गेल्या सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती.
Latest Videos
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
