लॅपटॉप हातात बाळगणाऱ्यांनी हजार रुपयाची तलवारदेखील हातात ठेवा
कश्मीर फाईल या विषयाला अनुसरून “धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाईलची पुनरावृत्ती ना होवो यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्यांनी एक हजार रुपयाची तलवारदेखील हातात ठेवावी.
धुळे येथे रामनवमीचा उत्साह मोठ्या जल्लोषात पार पडत असताना रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी साध्वी सरस्वती यांनी धुळेकरांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे. कश्मीर फाईल या विषयाला अनुसरून “धुळ्यात देखील दुसऱ्या कश्मीर फाईलची पुनरावृत्ती ना होवो यासाठी एक लाख रुपयाचा मोबाईल, लॅपटॉप हातात बाळगणाऱ्यांनी एक हजार रुपयाची तलवारदेखील हातात ठेवावी. असं शस्त्र ठेवणे तर आपल्या हिंदूंची शान आहे.” असे म्हणत साध्वी सरस्वती यांनी हिंदू तरुणांना तलवार हातात बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Apr 11, 2022 10:58 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

