AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'तो' काही महाराष्ट्राच्या हिताचा नाही, तो डिप्रेशनमध्ये चाललाय, त्याचं डोकं जाग्यावर नाही; राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्र्याची टीका

‘तो’ काही महाराष्ट्राच्या हिताचा नाही, तो डिप्रेशनमध्ये चाललाय, त्याचं डोकं जाग्यावर नाही; राऊत यांच्यावर केंद्रीय मंत्र्याची टीका

| Updated on: Apr 29, 2023 | 2:42 PM
Share

राणे यांनी राऊत यांचा कार्यक्रम ऐकण्यासारखा नसतो. त्यात जनहिताचे कोणते विचार नसतात. फक्त शिव्या, डिवचाडिवची असते. त्याचा मनात होतं ते त्यानं साध्य केलं.

मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे दररोज पत्रकार परिषद घेत केंद्रातील भाजप राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका करत असतात. त्यावरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर निशाना साधत त्यांचे आता मानसिक संतुलन विघडलं आहे. त्यांच डोकं जाग्यावर नाही. तर ते डिप्रेशनमध्ये जात असल्याची टीका केली आहे. यावेळी राणे यांनी राऊत यांचा कार्यक्रम ऐकण्यासारखा नसतो. त्यात जनहिताचे कोणते विचार नसतात. फक्त शिव्या, डिवचाडिवची असते. त्याचा मनात होतं ते त्यानं साध्य केलं. शरद पवार यांच्या डिलप्रमाणे शिवसेना संपवल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. तर राऊत हे आता महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा नसल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.

Published on: Apr 29, 2023 02:42 PM