रोज सकाळी बोलताय, मग कपडे फाडून घ्यायला तयार रहा; भाजप नेत्याचा राऊत यांच्यावर पलटवार
संजय राऊत हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. आता या टीकेली जशाच तस उत्तर दिलं जाईल असा इशाराच भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे
मुंबई : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल करत असतात. ते यातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना दिसतात. आता या टीकेली जशाच तस उत्तर दिलं जाईल असा इशाराच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे. तर राऊत यांनी भाजपवर हल्ला करत भामा पाटस कारखान्यावरून भाजपचे आमदार राहुल कूल आणि शिंदे गटाचे दादा भूसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तर अजून आपल्याकडे 70 एक प्रकरणं भाजपवाल्यांचे आहेत. जे सीबीआयकडे देणार असं म्हणत दौंड दौराही केला. त्यावरून आता भाजप आक्रमक झाली आहे. तर नितेश राणे यांनी राऊत यांनी भाजप नेत्यांवर आरोप केले तर त्यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडू असा दम दिला आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Apr 28, 2023 07:32 AM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
