रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांचा मोठा खुलासा
VIDEO | ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला असून त्या गरोदर होत्या असंही सांगितले जात असताना शिवसेनेकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे
ठाणे : ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण झाली. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच रशमी ठाकरे यांनी भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच काल नेमकं काय घडलं, हे जाणून घेतलं. तर मातृत्वासाठी उपचार सुरू असताना रोशनी शिंदे यांच्या पोटावर मारहाण केल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. याप्रकरणी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या मीनाक्षी शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणी बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या, ‘ज्यावेळी एखाद्या महिलेला मारहाण होते त्यावेळी एमएनसी रिपोर्टच्या आधारे गुन्हा नोंद होतो. सिव्हिल सर्जन यांनी जो रिपोर्ट दिला त्यातही कुठल्याही प्रकारची मारहाण झाली नसून ती महिला गर्भवती देखील नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देखील रोशनी शिंदे यांना लगेच घरी जायला सांगितले पण खासदार राजन विचारे यांनी जबरदस्ती रोशनी शिंदे यांना संपदा रुग्णालयात दाखल केले त्यामुळे हा सर्व प्रकार सहानुभूती मिळवण्यासाठी रोशनी शिंदे यांनी हे ढोंग केले असल्याचे त्यांनी म्हटले.
Published on: Apr 04, 2023 05:44 PM
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
