AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'ती' गोळी सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातील यासह पाहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये अपडेट

‘ती’ गोळी सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातील यासह पाहा 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये अपडेट

| Updated on: Jan 12, 2023 | 9:32 AM
Share

मुर्खासारखे बोलू नका, आम्ही स्वाभिमानाने गेलो आहोत, असे सांगत गिरीश महाजन यांचे कान चांगलेच टोचले आहेत.

मुंबई : गणपती विसर्जनावेळी शिंदे ( SHINDE ) आणि ठाकरे ( THACKREY ) गटात दादर ( DADAR ) परिसरातच राडा झाला होता. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर ( MLA SADA SARVANKAR ) यांनी गोळीबार केला असा आरोप करत ठाकरे गटाने दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तर, आमदार सरवणकर यांनी ती गोळी आपल्या पिस्तुलातून सुटलीच नाही असा दावा केला होता. पंरतु, बॅलेस्टिक तज्ज्ञांचा अहवाल आला असून त्यात ‘ती’ गोळी सरवरणकर यांच्याच पिस्तुलातील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन ( GIRISH MAHAJAN ) यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना फोडणे हे भाजपचे मिशन होते. आम्हाला सत्तांतरावर विश्वास बसत नव्हता. पण हळू हळू गोष्टी घडत गेल्या. आधी शिंदे मग त्यांचे सैन्य बाहेर पडले, असे वक्तव्य केले. त्याला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही भाजपमुळे शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. आम्हाला वर्षावर, मातोश्रीवर एन्ट्री नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो आहोत. मुर्खासारखे बोलू नका, आम्ही स्वाभिमानाने गेलो आहोत, असे सांगत गिरीश महाजन यांचे कान चांगलेच टोचले आहेत.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे फक्त नावासाठी खासदार झाला आहे. तो ॲक्टर पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. काही फुकट करत नाही. दाढी काढली तर त्याला कोणी ओळखणारही नाही. सिरीयल पुरताच तो मर्यादित आहे. 2024 ला अमोल कोल्हेंला आपटून टाकू. एवढा काही मोठा विषय नाही अशी टीका आमदार नितेश राणे यांनी वर्ध्यात एका कार्यक्रमात बोलताना केलीय. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केलीय.

Published on: Jan 12, 2023 09:30 AM