AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | 28 फेब्रवारीला नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

Nagpur | 28 फेब्रवारीला नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Dec 27, 2021 | 5:53 PM
Share

राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार आहे. तशी घोषणाच आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

राज्याचं पुढचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन होणार आहे. तशी घोषणाच आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

आज विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत पुढील अधिवेशनावर चर्चा झाली. काँग्रेसने मागच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनाबाबत आग्रह धरला होता. त्यामुळे पुढील अधिवेशन नागपुरात घेण्याचं आश्वासन काँग्रेस नेत्यांना देण्यात आलं होतं. त्यानुसार अधिवेशनाची तारीख आणि स्थान आज जाहीर करण्यात आलं आहे.

या आधी सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा आग्रह विरोधकांनीही धरला होता. त्यावर मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांना हवाई प्रवास सुद्धा करण्यास मनाई करण्यात आल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना प्रवास न करण्याचा सल्ला दिल्याने हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी ठेवला होता. तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत नसेल तर पुढील अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात घेण्याची मागणी विरोधकांनी केली होती. सत्ताधाऱ्यांनीही या मागणीला संमती दिली होती. त्यानुसार 28 फेब्रुवारी रोजी नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

Follow Us
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ