AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis यांनी माझी मागणी ऐकली असती तर आज ते मुख्यमंत्री असते : Ramdas Athawale

| Updated on: Jul 04, 2021 | 9:25 PM
Share

कोरोना काळातील देवदुतांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन संकल्प संस्था आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. (The event was held in honor of the angels of the Corona period)

मुंबई : कोविड पेशंट होतो मी सुद्धा आपण आहोत कोरोनो योद्धा
वंदन करतो मी शिवाजी महाराज आणि गौतम बुद्ध यांना
कारण माझ्या मनात आहे तुमच्यासाठी श्रद्धा
जसं बॅंकेत असतं आपलं खातं तसं नसतं माणुसकीचं नातं
कोरोनाने साऱ्या जगाला नाचवले
पण डॉक्टरने लाखो लोकांना वाचवले
अनेक पेशंटना हॉस्पिटलला पाठवले आणि मला आठवले
मी दिला होता गो कोरोनाचा नारा
कोरोनाला गो म्हणता म्हणता कोरोना माझ्या पाठी लागला
कोरोनाच्या काळात आरोग्य खाते चालवणे नव्हते सोपे पण त्याला पुरून उरले राजेश टोपे
देवेंद्र फडणवीस नी माझी मागणी ऐकली असती तर आज ते मुख्यमंत्री असते
अडीच अडीच वर्षे शिवसेनेला देऊन टाका
तुमच्यात एक मत होतं नसेल तर मला मुख्यमंत्री करून टाका