निलंगा ताडमुगळीमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल, मंदिरात नारळ फोडल्याने कुटुंबाचा बहिष्कार
निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने (Temple) मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नारळ वाढवला. या क्षुल्लक कारणावरुन गावातील संपूर्ण समाजानेच या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली आहे.
पुरोगामी महाराष्ट्र म्हणून पाठ थोपटली जात असली तरी याच (Maharashtra) राज्यात माणुसकीला काळीमा घटनाही घडत आहेत. निलंगा तालुक्यातील एका गावामध्ये तरुणाने (Temple) मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि नारळ वाढवला. या क्षुल्लक कारणावरुन गावातील संपूर्ण समाजानेच या कुटूंबावर बहिष्कार टाकल्याची घटना निलंगा तालुक्यातील ताडमुगळी गावात घडली आहे. तब्बल तीन दिवस या कुटूंबाला गावकऱ्यांनी वाळीत टाकले होते. बहिष्कार टाकल्यानंतर सदरील कुटूंबातील सदस्यांना साधे पीठही दळून दिले नसल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ नंतर पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर हे बहिष्कार प्रकरण मिटले आहे. पण एका समाजातील तरुणाने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानेच हा प्रकार घडला आहे. अद्याप याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही पण या प्रकरामुळे संताप व्यक्त होत आहे.
Published on: Feb 05, 2022 11:46 AM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
