राष्ट्रवादीत फूट नाही, शरद पवार यांचं म्हणणं नेमकं काय? पवारांच्या वक्तव्यामागे कोणती खेळी?
VIDEO | राष्ट्रवादीमध्ये फूट नाही हे सांगण्यासाठी नेमकी काय खेळी खेळली जातेय? फूट आहे की नाही, कायदेतज्ज्ञाचं मत काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले? पाहा स्पशेल रिपोर्ट
मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात अद्याप चर्चा सुरूच आहे. शरद पवार वारंवार म्हणताय राष्ट्रवादीत फूटच नाही. तसंच मीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, असं शरद पवार ठणकावून सांगताय. तर जे म्हणणं शरद पवार यांचं आहे तेच अजित पवार गटांचं देखील आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट नाही हे सांगण्यासाठी नेमकी काय खेळी खेळली जातेय. राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नाही हे सांगताना अजित पवार गटाविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे कारवाईसंदर्भात पत्र दिल्याचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे देखील सांगताय. अशातच राहुल नार्वेकर स्वतः सांगताय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीच फूट नाही कारण, राष्ट्रवादीमधील फुटीसंदर्भात त्यांच्याकडे कोणतंच पत्र आलं नसल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटलंय. बघा काय म्हणताय विधानसभा अध्यक्ष…
Published on: Aug 26, 2023 11:38 PM
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
