दरवाजे मोकळेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवयची!’ उद्धव ठाकरेंवर कुणाचा आरोप?

Shiv sena Politics : माझ्यामागे जेव्हा गाड्या लावल्या तेव्हा त्यांच्या जनरल सेक्रेटरींना फोन लावून मी जाब विचारलेलाय. माझ्यामागे गाड्या लावण्याची हिंमत करु नका', असंही ती त्यांना म्हटलंय.

दरवाजे मोकळेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवयची!' उद्धव ठाकरेंवर कुणाचा आरोप?
| Updated on: Sep 22, 2022 | 7:09 AM

प्रदीप कापसे, प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘जय पराजय मोकळेपणे स्विकारायचा असतो. आम्ही वेगवेगळे खेळ खेळतो, त्यामुळे आमच्याकडे खिलाडूवृत्ती आहे. त्यामुळे हरलो तर हरलो म्हणतो आणि जिंकलो तर जिंकलो म्हणतो. कारण आमच्याकडे खिलाडूवृत्ती आहे. पण त्यांच्याकडे खिलाडूवृत्ती नाही’, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे (Deepak Kesarkar on Uddhav Thackeray) आणि ठाकरे समर्थकांवर टीका केली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि सध्याच्या सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना (Shiv Sena Latest News) पक्षप्रमुखांवर टीका केला आहे. ‘इथं दारं खुली आहेत, असं म्हणायचं, आणि पाठीमागून माणसं पाठवायची, याला काय म्हणायचं? माझ्यामागे जेव्हा गाड्या लावल्या तेव्हा त्यांच्या जनरल सेक्रेटरींना फोन लावून मी जाब विचारलेलाय. माझ्यामागे गाड्या लावण्याची हिंमत करु नका’, असंही ती त्यांना म्हटलंय. दरवाजे मोकळे आहेत म्हणायचं आणि पाठीमागून माणसं पाठवायची, अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावलाय. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते. ज्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (Congress and NCP) दावणीला पक्ष बांधलाय, त्यांनी मेळावा घ्यावा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलवावं, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलंय. शिवाय उद्धव ठाकरेवर मी काही कमेंट करणार नाही, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.

 

Follow us
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.