स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज फडकावणं पडलं महागात! धाडस दाखवल्यानं तरूणाची थेट हत्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
नुकताच देशभरासह राज्यात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा कऱण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र याच दिवशी एका तरूणाने राष्ट्रध्वज फडकावला म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीसगड जिल्ह्यात माओवाद्यांकडून एका तरूणाची हत्या करण्यात आली. स्वतंत्र्यदिनी एका युवकाने राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे माओवाद्यांकडून त्या युवकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील बिनागुंडा या गावातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वतंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वज फडकवल्यामुळे माओवाद्यांकडून हत्या करण्यात आलेल्या तरूणानं मनेश नरेटी असं नाव आहे. ज्या बिनागुंडा या गावात ही खळबळजनक घडला घडली ते महाराष्ट्र छत्तीसगड सीमावरती असलेलं क्षेत्र आहे. या भागात माओवाद्यांच्या दहशतीमुळे कोणी ध्वजारोहण करण्यासाठी समोर येत नव्हते अशात अति संवेदनशील भागात या युवकाने धाडस दाखवून ध्वजारोहण केलं. मात्र त्यानंतर आज पहाटे या युवकाची माओवाद्यांकडून हत्या करण्यात आली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार

