Train Accident | ओडिशामध्ये कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं टि्वट
VIDEO | ओडिशामधील कोरोमंडल एक्स्प्रेसच्या भीषण अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणताय...
बालासोर : ओडिशातील बालासोर येथे काल संध्याकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली आणि ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर तर काही डब्बे पलटी झाली. देशातील हा आजवरचा सर्वात भीषण अपघात असल्याचे सांगितले जात असून मृतांची संख्या 233 वर पोहोचली आहे. तसेच अपघातात आतापर्यंत 900 प्रवासी जखमी झालेत तर अद्याप बचावकार्य सुरूच आहे. या भीषण अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून भाष्य केले आहे. ‘ओडिशातील रेल्वे अपघातामुळे व्यथित झालो आहे. शोकाकुल परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेले प्रवासी लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलणं झालंय. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सध्या मदत कार्य सुरू असून सर्व आवश्यक मदत पोहोचवली जाणार आहे.’, असे ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहे.
Published on: Jun 03, 2023 06:48 AM
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
