AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar गटाला मोठा झटका, Twitter अकाऊंट सस्पेंड अन्..., नेमकं काय आहे प्रकरण?

Ajit Pawar गटाला मोठा झटका, Twitter अकाऊंट सस्पेंड अन्…, नेमकं काय आहे प्रकरण?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 13, 2023 | 1:22 PM
Share

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात पक्ष आणि चिन्हासाठी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाला ट्विटरचा मोठा झटका बसला, काय आहे प्रकरण?

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर आता अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट तयार झालेत. अशातच राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी या दोन्ही गटाकडून दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप सुरू असताना मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवार गटाला ट्वीटरकडून मोठा झटका बसला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ट्वीटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्वीटरचे नियम पाळले नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार गटानं ट्वीटरचं NCPspeaks_official असं नवं अकाऊंट तयार केले होते. मात्र हेच अकाऊंट आता सस्पेंड करण्यातच आलं आहे. या ट्वीटर अकाऊंटवर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आला होता. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.

Published on: Sep 13, 2023 01:22 PM

Follow Us