ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेची नाराजी दूर? प्रभाग समितीवर तोडगा, पण…
स्वीकृत नगरसेवक पदावरून निर्माण झालेली मनसेची नाराजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखेर दूर केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पाच प्रभाग समित्यांवर प्रत्येकी एक वर्ष मनसेचा अध्यक्ष राहील, यावर लेखी सहमती झाली. संजय राऊत आणि वरुण सरदेसाई यांच्या मध्यस्थीनंतर हा तोडगा निघाला, ज्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमधील राजकीय संबंध सुधारले आहेत.
मुंबई महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर नाराज झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) अखेर नाराजी दूर करण्यात आली आहे. मनसेने मागणी केलेले स्वीकृत नगरसेवक पद न मिळाल्याने दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेने पाच प्रभाग समित्यांवर प्रत्येकी एक वर्ष मनसेचा अध्यक्ष राहील, ही मनसेची मागणी मान्य केली आहे. विशेष म्हणजे, ही अट लेखी स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे.

Published on: Mar 05, 2026 09:49 AM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द