भाजप ठाकरे गटाला मोठा धक्का देणार? राजन साळवी ‘या’ तारखेला भाजपचं कमळ घेणार हाती?
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंचा बडा शिलेदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत. उबाठाचे उपनेते आणि नाराज माजी आमदार राजन साळवी यांचं भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित झालं आहे.
भाजप उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कोकणातील शिवसेना उबाठातील बडा नेता आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार अल्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंचा बडा शिलेदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत आहेत. उबाठाचे उपनेते आणि नाराज माजी आमदार राजन साळवी यांचं भाजपमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित झालं आहे. पौष महिना संपल्याने आता येत्या 2 ते 3 दिवसांत साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजन साळवी यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी यांचा भाजप प्रवेश होणार अशी चर्चा कोकणासह राज्यभरात सुरु होती. विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर राजन साळवी यांनी पराभवाचं खापर फोडलं होतं. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा झाली होती. दरम्यान, राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. मात्र नाराज राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करण्याचं ठरवलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे राजन साळवी यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसणार असल्याचे दिसतंय.
Published on: Jan 31, 2025 01:38 PM
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
