AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut थेटच म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला मी जाणार पण...'

Sanjay Raut थेटच म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला मी जाणार पण…’

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Sep 16, 2023 | 12:39 PM
Share

VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेसाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये जाणार? पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर काय म्हणाले संजय राऊत?

मुंबई, १६ सप्टेंबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये मला मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यामुळे मी देखील पत्रकार परिषदेला जाणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी काल म्हटले. यावर आज पुन्हा संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. यावर संजय राऊत म्हणाले, ‘मी महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक आहे. माझी इच्छा झाली तर मी मुख्यमंत्र्यांच्या प्रेसला नक्की जाणार आहे. पण मी गेलो तर मला पोलीस अडवतील आणि गोंधळ होईल. मला असा गोंधळ नको आहे.’, असे म्हणत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला जाण्याची इच्छा व्यक्त केली.

Published on: Sep 16, 2023 12:39 PM
Follow Us