Ukraine युरोपीय युनियनचा सदस्य देश बनणार – Russia Ukraine War
यूक्रेनला सदस्य बनण्याची प्रक्रिया सुरु झालीय. यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्यासाठी यूक्रेननं केलेला अर्ज यूरोपियन संसदेनं (European Parliament) स्वीकारला आहे.
नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि यूक्रेनमध्ये (Ukraine) सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेन आता यूरोपियन यूनियनचा (European Union) सदस्य बनणार आहे. यूक्रेनला सदस्य बनण्याची प्रक्रिया सुरु झालीय. यूरोपियन यूनियनमध्ये सहभागी होण्यासाठी यूक्रेननं केलेला अर्ज यूरोपियन संसदेनं (European Parliament) स्वीकारला आहे. दरम्यान, यूक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनचं मोठं नुकसान झालंय. रशियाकडून यूक्रेनच्या अनेक शहरांवर सातत्याने बॉम्ब वर्षाव सुरु आहे. कीवसह देशातील प्रमुख शहरांना रशियन सैन्याकडून निशाणा बनवलं जात आहे. यूक्रेनमधील दुसरं सर्वात मोठं शहर खार्किववर रशियन सैन्य आणि यूक्रेनी सैन्यात जोरदार लढाई सुरु आहे.
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
