Trumps Dual Blow: आधी टॅरिफ आता भारतीय कंपन्याही खूपल्या, एकाच दिवसात ट्रम्पची भारत अन् चीनवर मोठी कारवाई
ट्रम्प प्रशासनाने एकाच दिवशी भारत आणि चीनविरोधात कठोर कारवाई केली आहे. अमेरिकेने इराणशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरून भारतातील सात कंपन्या आणि आठ व्यक्तींवर निर्बंध लादले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने एकाच दिवसात भारत आणि चीन या दोन्ही देशांवर कठोर कारवाई केली आहे. एका बाजूला, भारताच्या सात कंपन्या आणि आठ व्यक्तींवर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. अमेरिकेच्या आरोपानुसार, या कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्सचे इराणी तेल जगभरात पाठवले, ज्यामुळे इराणला दहशतवाद्यांना निधी पुरवता आला. या निर्बंधांमुळे संबंधित भारतीय कंपन्यांना आणि व्यक्तींना अमेरिकेत व्यवसाय करण्यास आणि प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दुसऱ्या बाजूला, ट्रम्प यांनी चीनवर आता थेट 100 टक्के अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीच अमेरिकेने चीनवर 30 टक्के टॅरिफ लादला होता. त्यामुळे, 1 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या या नवीन नियमानुसार, चीनमधून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या वस्तूंवर एकूण 130 टक्के टॅरिफ आकारला जाईल. याचा अर्थ, 100 रुपयांची चिनी वस्तू अमेरिकेत थेट 230 रुपयांना मिळेल. चीन विविध क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ खनिजांवर नियंत्रण मिळवू पाहत असल्याने अमेरिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे, ज्यामुळे चिनी वस्तूंच्या निर्यातीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा

