AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबाच्या पायघड्या, हेलिकॉप्टरमधून स्वागत, पाहा बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नाचा 'हा' खास व्हायरल व्हिडिओ

गुलाबाच्या पायघड्या, हेलिकॉप्टरमधून स्वागत, पाहा बड्या उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नाचा ‘हा’ खास व्हायरल व्हिडिओ

Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Feb 10, 2023 | 12:59 PM
Share

जळगाव येथील अंमळनेर मधील प्रसिद्ध उद्योगपती सुरज गोकलाणी यांच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाठात झाले. त्यांची सूनही बड्या घरची. अहमदनगरचे उद्योगपती चंदानी यांची ती लाडकी लेक.

जळगाव : हौसेला काही मोल नसते असे म्हणतात. याचाच प्रत्यय नुकताच जळगावकरांना आला. जळगाव येथील अंमळनेर मधील प्रसिद्ध उद्योगपती सुरज गोकलाणी यांच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाठात झाले. त्यांची सूनही बड्या घरची. अहमदनगरचे उद्योगपती चंदानी यांची ती लाडकी लेक. गोकलाणी यांची सून माहेरपणासाठी अहमदनगरला गेली होती. तिला परत सासरी आणण्यासाठी सासऱ्यांनी खास इंतझाम केला होता. गोकलाणी यांनी तिला आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टर पाठवले. जेव्हा हेलिकॉप्टरमधून सून उतरली तेव्हा गुलाबाच्या पायघड्या, रंगीत रांगोळीने तिचे स्वागत करण्यात आले. तिच्या स्वागतासाठी गोकलाणी कुटुंब हजर होते. सुनेचे स्वागत करतानाच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Published on: Feb 10, 2023 12:59 PM
Follow Us