AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | Accident | पाम बीचवर स्पोर्ट्स बाईक आणि इनोव्हाची जोरदार धडक! सिग्नल तोडला नसता तर...

Video | Accident | पाम बीचवर स्पोर्ट्स बाईक आणि इनोव्हाची जोरदार धडक! सिग्नल तोडला नसता तर…

| Edited By: | Updated on: Feb 06, 2022 | 4:56 PM
Share

Navi Mumbai Accident : ईनोव्हा कार आणि स्पोर्ट्स बाईकमध्ये रविवारी (6 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधला जातो आहे.

नवी मुंबईतील पाम बिच रोडवर (Navi Mumbai Palm Beach Road) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार आणि बाईकची एकमेकांमध्ये जोरदार धडक धाली. हाअपगात इतका भीषण होता की अपघातात बाईकचा चक्काचूर झाला आहे. तर कारचंही मोठं नुकसान झालंय. तसंच कारचालकासह दुचाकीस्वारही गंभीररीत्या जखमी झाला आहे. सिग्नल तोडल्यामुळे हा अपघात जाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. ईनोव्हा कार आणि स्पोर्ट्स बाईकमध्ये (Accident between Innova car and sports bike) रविवारी (6 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधला जातो आहे. रविवार असल्यानं पाम बीच रोडवर फारशी वाहतूक नसते. त्यामुळे रविवारच्या दिवशी वेगानं वाहनं चालवण्याचे प्रमाणे पाम बीच रोडवर सर्रास पाहायला मिळतात. अनेकदा वाहतूक पोलिसही नसल्यामुळे सिग्नलही कुणी पाळत नाही. दरम्यान, रविवारी झालेला इनोव्हा आणि दुचाकीचा अपघात हा सिग्नल तोडल्यामुळेच झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Published on: Feb 06, 2022 04:31 PM