Mcoca Act : संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोका लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदार यांच्यावर मकोका लावण्यात आलाय.
हत्या आणि खंडणी प्रकरण एकच असल्याचे म्हणत बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ८ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनवणे आणि महेश केदार यांच्यावर मकोका लावण्यात आलाय. यापैकी कृष्णा आंधळे हा आरोपी फरार असून तो पोलिसांच्या जाळ्यात अद्याप अडकलेला नाही. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाईज्ड क्राईम अॅक्ट म्हणजेच मकोका… संघटित गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी १९९९ मध्ये हा कायदा आणण्यात आला. ‘टाडा’च्या धर्तीवर मकोका कायदा तयार करण्यात आला. परवानगीचा अर्ज मकोका कायदा कलम २३ (१) नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे पाठवला जातो. अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगारी टोळीच्या मागील १० वर्षांच्या गुन्ह्याचा तपशील दिला जातो. तर अहवालाचा अभ्यास करून मकोका लावल्यास पोलीस महानिरीक्षकांकडून मंजुरी येते. सदर परवानगी मिळाल्यानंतरच मकोकांतर्गत कारवाई केली जाते. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारने हा कायदा आणला होता. तर संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा असल्याने लवकर जामीन मिळत नाही. त्यामुळे या प्रकरणातील 8 जणांवर मकोका लावण्याने पोलिसांना तपसासाठी ६ महिने मिळणार तर आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६ महिने मिळणार आहे.
Published on: Jan 12, 2025 12:50 PM
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
