‘झुंड मे तो सुवर आते है, रत्नागिरीत राणेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी

राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळतेय. सुवर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता हे माईंड इट या नावाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकलेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 04, 2022 | 12:24 PM

सतिश सावंत हल्ला प्रकरणानंतर राणे आणि शिवसेना यांच्यातलं राजकीय वैर पुन्हा एकदा समोर आलं. आज भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपुर्व जमिन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्हा बॅकेवर भाजप म्हणजेच राणे पॅनलचा कब्जा मिळवल्यानंतर आता याचे राजकीय पडसाद कोकणात जाणवू लागलेत शिवसेनेच्या बालेकिल्यात आता राणे समर्थनाचे बॅनर झळकलेत. कोकणात आता भाजपकडून पोस्टर वाॅर सुरु झालंय. जिल्हा बॅकेच्या विजयानंतर रत्नागिरीत सध्या राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळतेय. सुवर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता हे माईंड इट या नावाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकलेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें