AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जलसिंचन नाही, अजित पवारांकडे आता ‘हे’ मंत्रिपद?

अजित पवारांनी सहकार विभाग आणि साखर विभागाच्या प्रशासनाकडून आढावा घेतल्यामुळे अजित पवारांकडे सहकार क्षेत्राची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत आहेत.

जलसिंचन नाही, अजित पवारांकडे आता 'हे' मंत्रिपद?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 01, 2019 | 12:15 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सहकार मंत्रालयाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्रिपदासोबत अजित पवारांकडे (Ajit Pawar Ministry) सहकार क्षेत्राची (Co-Operation Ministry) जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत मिळत आहेत.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप बाकी आहे. मात्र त्याआधीच अजित दादा अॅक्शन मूडमध्ये दिसत आहेत. यंदाचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अजित पवारांनी सहकार विभाग आणि साखर विभागाच्या प्रशासनाकडून आढावा घेतला.

साखर कारखाने 25 तारखेपासून सुरु झाले आहेत, मात्र काही कारखान्यांच्या अडचणी आहेत, हार्वेस्टिंग आणि इतक काही समस्या असल्यामुळे त्यासाठी निधीची गरज आहे. या समस्यांसंदर्भात तोडगा काढण्याची गरज आहे, असं मत अजित पवारांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं.

सहकार विभाग आणि साखर आयुक्त विभागाला एकत्र येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. ऊसतोड झाली पाहिजे, कारखाने बंद पडू नयेत, कारण रोजगाराचा प्रश्न आहे. त्यामुळे सकारात्मक भूमिकेचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध

सभागृह चालवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांना एकमेकांची गरज लागते. त्यासाठी सामंजस्याची आवश्यकता असते. महाराष्ट्राची ती परंपरा आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेला वाद आता शमला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं आहे, तर उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे.

उपमुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीला जयंत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. अजित पवारांनी बंड पुकारल्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता कमी होती. परंतु दरम्यानच्या काळात अजित पवारांचे पुन्हा रुसवे-फुगवे झाल्यामुळे त्यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

गंमत म्हणजे अजित पवार यांनी बंडखोरी करत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे  अजित पवार आधी एका पक्षासोबत आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना दिसतील, तेही अवघ्या काही दिवसांच्या अंतराने. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी असल्याने राष्ट्रवादीकडून नेमकं कोण उपमुख्यमंत्री (Ajit Pawar Ministry) होणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती