AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुंकवाविना सुवासिनी तशी खडसेंविना विधानसभा, महाजनांच्या आठवणीने खडसे भावनिक

कुंकवाविना सुवासिनीची कल्पना करवत नाही, तशी खडसेंविना विधानसभेची कल्पना करता येत नाही' असं वक्तव्य भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एका सभेत केलं होतं

कुंकवाविना सुवासिनी तशी खडसेंविना विधानसभा, महाजनांच्या आठवणीने खडसे भावनिक
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 17, 2019 | 11:03 AM
Share

जळगाव : विधानसभेतून मला निलंबित केलं होतं, तेव्हा ‘कुंकवाविना सुवासिनीची कल्पना करवत नाही, तशी खडसेंविना विधानसभेची कल्पना करता येत नाही’ असं वक्तव्य भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एका सभेत केलं होतं, अशी आठवण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse Remembers Pramod Mahajan) जागवली.

ज्या वेळेस मला विधानसभेने निलंबित केलं होतं, त्यावेळेस एका सभेत प्रमोद महाजन म्हणाले होते, की ‘विधानसभेतला नाथाभाऊंचा आवाज संपूर्ण महाराष्ट्राला आवडतो. विधानसभेने एकनाथ खडसे यांना निलंबित केले म्हणजे ”कुंकवाविना सुवासिनीची कल्पना सहन करता येत नाही” तसेच नाथाभाऊविना विधानसभा ही कल्पना मला सहन होत नाही’ अशी आठवण एकनाथ खडसे यांनी सांगितली. जळगावातील भुसावळमध्ये प्रचारसभेदरम्यान भाजपशी एकनिष्ठ असल्याचं सांगताना खडसे भावनिक झाले.

पक्षाने तिकीट न दिल्याने एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करुन पक्षाला सूचक संदेश दिला आहे का, या चर्चांना उधाण (Eknath Khadse Remembers Pramod Mahajan) आलं आहे.

राष्ट्रवादीकडून पक्षप्रवेशाची ऑफर

राष्ट्रवादीवाले माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली. अखेर राष्ट्रवादीला शिवसेनेकडून उसनवार घेतलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. त्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला, पण त्याने अद्याप शिवसेना सोडली नाही, पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला नाही, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.

एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना, जे पंतप्रधानपदावर दावा करतात, त्या शरद पवारांना मुक्ताईनगर मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला, एवढी दयनीय अवस्था शरद पवार यांची झाली असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

माझ्यावर अन्याय झाला असून आजही मी पक्षाला तेच विचारतोय की मी काय गुन्हा केला आहे? ज्या पक्षाने मला मोठं केलं, मंत्रिपद दिलं, त्या मायेने एकाएकी मला सोडून दिलं. मात्र तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, असे भावनिक उद्गार एकनाथ खडसे यांनी भुसावळमधील प्रचार सभेदरम्यान काढले.

राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देत पक्षप्रवेशाची ऑफर : एकनाथ खडसे

भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पाच वर्ष संजय सावकारे नाथाभाऊ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जवळचे आमदार मात्र पळून गेले. आता नाथाभाऊच्या मागे गेलो, तर आपलंही तिकीट कापलं जाईल अशी भीती त्यांना होती. मात्र तिकीटवाटप माझ्याकडे होतं. मी महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डात असून तिकीटवाटप मला विश्वासात घेऊनच झालं, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

2014 मध्ये युती तोडण्याचा राग शिवसेनेने माझ्यावर काढला. मात्र हा पक्षाचा सामूहिक निर्णय होता. तो निर्णय जाहीर करायला कोणी पुढे येत नव्हते. मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? ही धमक कोणात नव्हती म्हणून मी पुढे आलो, असं एकनाथ खडसे म्हणाले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या