AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मातोश्री’च्या अंगणाचा तिढा सुटला, उद्धव ठाकरेंनी ठरवलं वांद्रे महापौरांचे!

विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना पुन्हा संधी देण्यावरुन शिवसेनेमध्ये खलबतं झाली. अखेर, तृप्ती सावंत यांचं तिकीट कापून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना रिंगणात उतरवण्यावर शिक्कामोर्तब झालं.

'मातोश्री'च्या अंगणाचा तिढा सुटला, उद्धव ठाकरेंनी ठरवलं वांद्रे महापौरांचे!
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 04, 2019 | 7:56 AM
Share

मुंबई : शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘वांद्रे पूर्व’ या मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डच्चू देत शिवसेनेने उमेदवारीची माळ मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Mayor Vishwanath Mahadeshwar) यांच्या गळ्यात (Vandre East Shivsena Candidate) टाकली आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून लढण्यासाठी एबी फॉर्म देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. शिवसेना नेते अनिल परब यांनी एबी फॉर्म देतानाचा फोटो शेअर करत सोशल मीडियावरुन याविषयी माहिती दिली.

तृप्ती सावंत यांना पुन्हा संधी देण्यावरुन पक्षामध्ये खलबतं सुरु होती. तृप्ती सावंत यांना उमेदवारी द्यावी की त्यांचं तिकीट कापून महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना रिंगणात उतरवावं, याविषयी चर्चा झाली. अखेर तृप्ती सावंत यांना डावलून महाडेश्वरांच्या पारड्यात मत (Vandre East Shivsena Candidate) पडलं.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (4 ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी लगबग करावी लागणार आहे. काँग्रेसने वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी दिली आहे.

पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत विजयी

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश (बाळा) सावंत दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले होते. सावंतांनी भाजपच्या कृष्णा पारकर यांचा पराभव केला होता. मात्र 2015 मध्ये सावंत यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक जाहीर झाली.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेकडून मराठी अभिनेत्रीला उमेदवारी

2014 मधील निवडणुकीनंतर भाजप-सेनेची युती झाल्यामुळे शिवसेनेने प्रकाश सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांनाच उमेदवारी दिली. तर भाजपने उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र नारायण राणे काँग्रेसकडून रिंगणात उतरले होते.

‘मातोश्री’च्या अंगणातील जागा पटकावण्याच्या इरेने उतरलेल्या नारायण राणे यांना पोटनिवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. तृप्ती सावंत पोटनिवडणुकीत जवळपास 20 हजारांच्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

शिवसेनेची नवी पद्धत

उमदेवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यावर्षी मातोश्रीवर अधिकृत उमेदवारांना पक्षाच्या एबी फॉर्मचे वितरण केले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील अनेक इच्छुक मातोश्रीवर येऊन आपले एबी फॉर्म उद्धव ठाकरेंकडून स्वीकारत आहेत.

बंडखोरी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं. जाहीरपणे यादी प्रसिद्ध न करता उमेदवारांना बोलवून त्यांनी एबी फॉर्म दिला. युतीमध्ये शिवसेना 124 जागा लढवणार आहे. पण इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही ठिकाणचा वाद उद्धव ठाकरे यांनी दोन उमेदवारांना समोरासमोर बसवून सोडवला.

गेल्या काही दिवसांत तिकीट वाटपावरुन शिवसेनेत बराच खल झाला. भांडुप पश्चिमचे विद्यमान आमदार अशोक पाटील यांचा पत्ता कट करत त्यांच्या जागी रमेश कोरगावकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. दोन्ही इच्छुक तीन दिवसांपासून ‘मातोश्री’वर तळ ठोकून होते.

याआधी, तिकीटासाठी ‘मातोश्री’वर तळ ठोकणाऱ्या महेश कोठे यांचा पत्ता कट झाला होता. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून दिलीप मानेंना उमेदवारी मिळाली आहे. दिलीप माने हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत.

दुसरीकडे करमाळा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट करत शिवसेनेने या मतदारसंघात राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर केली. बागलही दोन-तीन दिवस ‘मातोश्री’वर आशेने येत होत्या.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या