उद्धव ठाकरे नवे मुख्यमंत्री, शिवतीर्थावर शपथविधी संपन्न!

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेतील.

उद्धव ठाकरे नवे मुख्यमंत्री, शिवतीर्थावर शपथविधी संपन्न!

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईत शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात संध्याकाळी सहा वाजून 40 मिनिटांच्या मुहूर्तावर हा ग्रँड शपथविधी सोहळा (Uddhav Thackeray Sworn in Ceremony) सुरु झाला. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल यासारख्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत हजारो जण उपस्थित होते. (Uddhav Thackeray Sworn in Ceremony)

उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी तर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत शपथ घेतली.

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीने या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांनी शपथ घेतली.  मग राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी तर नंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शपथ घेतली. काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या शपथविधीने सांगता झाली.

या शपथविधीसाठी देशभरातून मान्यवर आले होते. यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते उद्धव ठाकरे यांचे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी. राज ठाकरे हे सहकुटुंब आले होते.

पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा 

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा 

मंत्रिमंडळाची बैठक

सह्याद्री अतिथीगृहावर 8 वाजता मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शपथविधी लाईव्ह Uddhav Thackeray Sworn in Ceremony

पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन, ट्विट करुन शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन आणि आई वडिलांना स्मरुन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

 • उद्धव ठाकरे यांचं शिवतीर्थावर आगमन 
 • राज ठाकरे कुटुंबियांसह उपस्थित, आई कुंदा, मुलगा अमित, बहीण जयजयवंती आणि मेहुणे अभय देशपांडे उपस्थित
 • देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर पोहोचले
 • राज ठाकरे, अमित ठाकरे यांचं आगमन
 • वर्षा निवासस्थानातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघाले. सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित. शपथविधी सोहळ्यासाठी वर्षा निवासस्थानातून रवाना, वर्षा निवासस्थानातून आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर पडले, दिवसभर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या चित्रा वाघ , देवेंद्र फडणवीस यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांनी घेतली होती भेट
 • Picture

  प्रेक्षकांची पसंती टीव्ही 9 मराठी


  28/11/2019,6:02PM
 • देवेंद्र फडणवीस शपथविधीसाठी शिवतीर्थाकडे रवाना
 • शिवसेनेचे आमदार शपथविधीसाठी रवाना
 • साडेपाच वाजता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधीसाठी रवाना होणार
 • उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधींच्या शुभेच्छा

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्यभरातील कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. तीनही पक्षांचे झेंडे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. शपथविधीपूर्वी  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीने ज्या कार्यक्रमावर सरकार चालणार आहे, तो किमान समान कार्यक्रम (Common Minimum Program) जाहीर केला. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत,किमान समान कार्यक्रम (Common Minimum Program) सांगितला. शेतकरी, कामगार, युवक, महिला, शहर, पर्यटन, रोजगार,  अशा विविध विषयांना किमान समान कार्यक्रमात स्पर्श केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *