कमी पाण्यात भरघोस उत्पन्न! दुष्काळातही भाजीपाला फुलणार, हा भाजीपाला शेतकऱ्यांसाठी वरदान

Minimal water Vegetables: मराठवाड्यासह विदर्भ आणि राज्याला तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. अशात भाजीपाला लागवड करणे जिकरीचे आणि आव्हानात्मक आहे. पण पाणी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या भाजीपाल्याचे उत्पादन घेता येते.

कमी पाण्यात भरघोस उत्पन्न! दुष्काळातही भाजीपाला फुलणार, हा भाजीपाला शेतकऱ्यांसाठी वरदान
कमी पाण्यात भाजीपाला उत्पादन
| Updated on: Oct 13, 2026 | 1:04 PM

Minimal water Vegetables: राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. राज्य सरकारनेही 264 तालुके आणि नंतर 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. दुष्काळात काही ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष आहे तर काही शेतातील विहिरीत अद्याप पाणी आहे. ज्यांनी जल संवर्धन केले आहे. त्यांना फायदा झाला आहे. भाजीपाला लागवड करणे तसे आव्हानात्मक आहे. पण कमी पाण्यावर काही भाज्या चांगलं उत्पादन देतात. पाणी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाल्याचे चांगले उत्पादन घेता येते.

कमी पाण्यावर येणार्‍या भाज्या

Loading...

विहिरीला पाणी असेल तर मोठं पीक घेण्याऐवजी कमी पाण्यावर येणार्‍या भाज्यांची लागवड फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी कमी दिवसांत तयार होणाऱ्या भाज्यांची निवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे.

मेथी, कोथिंबीर या भाज्या 25-30 दिवसात येतात. या भाज्यांना अधिकचे पाणी लागत नाही. सध्या दुष्काळामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. किंमतही चांगली मिळत आहे. योग्य नियोजन आणि पाणी व्यवस्थापन केल्यास हा भाजीपाला शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.

पालक आणि शेपूची भाजी सुद्धी कमी पाण्यात आणि कमी कालावधीत चांगले उत्पादन देते. यासोबतच शेतकरी गवार आणि चवळीचाही विचार करू शकतात. या भाज्यांमध्ये उन्ह सहन करण्याची क्षमता असल्याने अधिक ताण पडल्यावरही उत्पादनात मोठी घट येत नाही. भेंडी मध्यम ते कमी पाण्यात चांगली येते. याशिवाय शेतकरी कारले, दोडका आणि दुधी भोपळा या वेलवर्गीय भाज्यांचाही विचार करू शकतात.

काय घ्यावी काळजी?

या भाज्यांना ठिबक सिंचन अथवा तुषाराची सोय झाल्यास पाणी बचत होते आणि मुबलक पाणी मिळाल्याने भाजीपाल्याचे उत्पादन चांगले होते.

या भाज्यांसाठी सुक्ष्म पाणी नियोजनाचा शेतकर्‍यांना फायदा होतो. पाणी थेट मुळांशी जात असल्याने पाण्याची बचत होते. जमिनीत ओलावा टिकून राहतो.

जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी शेतकरी पिकांच्या ओळींवर 25-30 मायक्रॉनचे प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरू शकतात.

जर प्लास्टिक उपलब्ध नसेल, खर्च वाढत असेल तर शेतकरी गवत, भुसा, ऊसाच्या पाचटाचाही वापर करू शकतात.

या काळात शेतकऱ्यांनी रोग होऊ नये यासाठी फवारणी करणे आणि खताचे सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खताचा वापरही फायदेशीर ठरतो.

शेडनेटचा वापर केल्यास अधिक फायदा होईल. अथवा उष्णतेपासून वाचवण्यासाठी साड्यांचा अच्छादनासारखा वापर करता येतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us