AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही म्हैस म्हणजे दुधाचं ATM! दिवसभरात देते 15 लिटरपर्यंत दूध, खटाखट मोजा पैसा

Animal Husbandry: दूध विक्री व्यवसायासाठी ही म्हैस एखाद्या एटीएमपेक्षा कमी नाही. तुम्ही जर दुग्ध व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर या जातीची म्हैस तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्हाला दिवसभरात 15 लिटरपर्यंत दूध मिळू शकते.

ही म्हैस म्हणजे दुधाचं ATM! दिवसभरात देते 15 लिटरपर्यंत दूध, खटाखट मोजा पैसा
ही म्हैस म्हणजे व्हा मालामाल
| Updated on: Oct 13, 2026 | 12:14 PM
Share

Murrah Buffalo: तुमच्याकडे दोन-चार म्हशी असतील तर गाव, तालुक्याला, बाजार गावाला दूध विकून चार पैसे गाठीशी ठेवता येतात. पण जर दुग्ध व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर कोणत्या जातीची म्हैस खरेदी करणे चांगले राहिल? खर्च झाला तरी अधिक दूध मिळत असल्याने तुम्हाला फायदा होईल अशी म्हशीची एक जात आहे. तुम्ही मुऱ्हा जातीची म्हैस खरेदी केल्यास चांगले दूध उत्पादन होईल. ही म्हैस चांगले दूध देते आणि त्यातील फॅटचे प्रमाणही अधिक आहे.

आता देशभरात मुऱ्हा जातीची मागणी

मुऱ्हा जातीच्या म्हशीचा रंग हा गडद काळा असतो. या म्हशीचे शिंग ही छोटी आणि वर्तुळाकार असतात. शरीर मजबूत असते. ही म्हैस प्रामुख्याने हरियाणा आणि पंजाब राज्यात आढळते. पण उत्तर प्रदेश, राजस्थानसह दक्षिण भारतातही या म्हशीची मागणी वाढली आहे. इतकेच नाही तर पूर्व आणि पश्चिम भारतातही या म्हशीला मोठी मागणी आहे. पशूपालक ही म्हैस खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात. योग्य निगा ठेवल्यास ही म्हैस चांगले दूध देते. या दुधात फॅट अधिक असल्याने फायदा होतो. तूप, ताक आणि दूधदुभत्यामुळे मालक मालामाल होतो.

एका दिवसात किती दूध देते मुऱ्हा म्हैस?

तंदुरुस्त आणि संतुलित आहार घेणारी मुऱ्हा म्हैस दिवसभरात जवळपास 10 ते 15 लिटर दूध देते. अर्थात म्हशीच्या तब्येतीनुसार, त्यात फरक दिसू शकतो. वय, दाणापाणी, तब्येत आणि बछडे देण्यातील कालावधी याचा परिणाम या म्हशीच्या दुधावर दिसून येतो.

मुऱ्हा जातीच्या म्हशीची किंमत किती?

मुऱ्हा जातीच्या म्हशीची किंमत दूध देण्याची क्षमता, वय, आरोग्य आणि दूध देण्याच्या नोंदीवर अवलंबून असते. जास्त दूध देणाऱ्या काही म्हशीची किंमत लाखांच्या घरात असते. पण मुऱ्हा जातीची म्हैस इतकी महाग नसते. ही म्हैस खरेदी करताना सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करा. तुम्हाला अपेक्षित गणित जुळल्यास म्हैस खरेदी करता येऊ शकते. पण केवळ म्हशीच्या जातीवर अधिक रुपये मोजणे योग्य ठरणार नाही.

मुऱ्हा म्हशीला काय खाऊ घालावे?

दूध चांगले मिळावे, यासाठी या म्हशीला संतुलित आहार द्यावा. या म्हशीच्या आहारात हिरवा चारा, वाळलेला चारा आणि इतर महत्त्वाच्या घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. या म्हशीला मोकळे वातावरण, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ गोठा असणे आवश्यक आहे. रोग टाळण्यासाठी पशूतज्ज्ञाचा सल्ला घेणे गरजेचा आहे. अधिक उन्ह, कडाक्याच्या थंडीपासून या म्हशीचा बचाव करणे आवश्यक आहे.

Follow Us
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!