AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळातही संधी… एकदा लावा आणि 3 वर्षांत भरघोस मिळवा हिरवा चारा

Drought Fodder Shortage: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पाण्यासोबतच गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. अशावेळी लसूणघास शेतकऱ्यांसाठी चांगला चारा ठरू शकतो. ज्यांच्याकडे थोडंबहुत पाणी आहे. त्या शेतकऱ्यांना याचं उत्पादन घेता येईल.

दुष्काळातही संधी... एकदा लावा आणि 3 वर्षांत भरघोस मिळवा हिरवा चारा
3 वर्षांत भरघोस मिळवा हिरवा चारा
| Updated on: Oct 09, 2026 | 1:13 PM
Share

Animal Fodder: महाराष्ट्रासह देसातील अनेक राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पाण्यासोबतच गुरांच्या चाऱ्याचा ही प्रश्न बिकट झाला आहे. गाय-म्हैस, बैल असणार्‍या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे. चाऱ्याचे दरही वधारले आहेत. चारा मिळत नसल्याने काहींनी गुरांच्या बाजारात जनावरं नेली तर त्यांना कमी किंमत मिळत आहे. शेतातील विहीर अथवा बोअरवेलला थोडेबहुत पाणी येत असेल तर लसूणघास, मेथी गवत हा शेतकऱ्यांसाठी चाऱ्याचा चांगला पर्याय ठरू शकतो. लसूण घास लावल्यावर त्याची अनेकदा कापणी होते. यामुळे चाऱ्याची समस्या कमी होते. जनावरांना हिरवा ताजा आणि पौष्टीक चारा मिळतो. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते.

खरीप हंगामात पावसाने 60 दिवस डोळे वटारले. यामुळे या हंगामात उत्पादन निम्म्यावर आणि काही ठिकाणी शून्यावर आले आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या दुसरा आठवडा सुरू झाला आहे. हा कालावधी लसूण घास, मेथी गवतासाठी चांगला मानल्या जातो. या घासाची लागवड डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत करणे चांगले मानले जाते. पण सध्याचा काळ अनुकूल मानल्या जातो. ICAR च्या कृषीतज्ज्ञांनी सुद्धा हा काळ या घासाच्या लागवडीसाठी योग्य सांगितला आहे.

लसूण गवतासाठी शेतीची मशागत

मेथी गवताच्या लागवडीसाठी जमीन भुसभुशीत असणे आवश्यक आहे. ती समतल, एकसारखी असणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतातील एक पट्टा तयार करता येतो. या गवताला जास्त पाणी लागत नाही. जास्त पाणी असल्यास ही घास प्रभावित होते. वाढ खुंटते. शेण, नैसर्गिक खत अथवा पंचगव्याचा वापर करून जमिनीचा पोत सुधारून लागवड केल्यास ही घास जोमाने येते.

एका ओळीत लावल्यास अधिक फायदा

लसूणघासचे बी एकाच ओळीत टाकल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. बी सुद्धा कमी लागते. ओळीत पेरणीसाठी प्रति हेक्टर साधारणपणे 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे मानले जाते. तर या ओळींमध्ये कमीत कमी 25 ते 30 सेमीचे अंतर असणे आवश्यक आहे. हे बी अधिक खोलवर टाकू नका. कारण ते जळू शकते. त्याच्या वाढीसाठी योग्य आर्द्रता आवश्यक आहे.

60 दिवसात पहिली कापणी

योग्य लागवडीनंतर 60 दिवसात या गवताची पहिली कापणी करता येते. त्यानंतर हवामान आणि योग्य पाणी दिल्यास जवळपास 25-35 दिवसाच्या अंतराने कापणी करता येते. लसूण घासाच्या काही जातीत सहा ते सात वेळा कापणी होऊन 700-800 क्विंटल हिरवा चारा प्रति हेक्टर मिळू शकतो.

Follow Us
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
Nana Patekar : नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....
मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर
Mumbai Heat Wave : मुंबईकरांनो, उकाड्यासाठी तयार राहा; ऑक्टोबरमध्ये तापमान 37.6 अंशांवर, हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी
केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट.....
Maharashtra Drought : केंद्रीय पथक आज शेतीच्या बांधावर; दुष्काळी स्थितीचा अहवाल थेट दिल्लीत पाठवणार
महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? महापालिकेच्या....
Mumbai Ritu Tawade : महापौरांच्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशांतून 25 लाख? मुंबई महापालिकेच्या प्रस्तावावरून वाद