AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjeevani Patil : जास्त पैसे मागितले म्हणून थेट…’रात्रीस खेळ चाले’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, त्यानंतर मी आजारी…

Ratris Khel Chale Fame Actress : 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीनं धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्रीनं मानधन वाढवून मागितलेलं म्हणून तिला मालिकेतून काढून टाकण्यात आलेलं.

Sanjeevani Patil : जास्त पैसे मागितले म्हणून थेट...'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, त्यानंतर मी आजारी...
| Updated on: Nov 23, 2026 | 4:15 PM
Share

झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले‘ ही मालिका प्रचंड गाजली. त्याचसोबत मालिकेतील कलाकारसुद्धा चर्चेत आले. या मालिकेतील एका भूमिकेला प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळालं. ती भूमिका म्हणजे वच्छी. ‘रात्रीस खेळ चाले‘ या मालिकेत वच्छीची भूमिका अभिनेत्री संजीवनी पाटीलनं साकारलेली. मात्र, अचानक या मालिकेत वच्छीच्या मृत्यूचा सीन दाखवला आणि अभिनेत्रीची या मालिकेतून एक्झिट झाली. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत संजीवनी पाटील यांनी ‘रात्रीस खेळ चाले‘ मालिकेबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.

संजीवनी पाटील यांनी सांगितला प्रसंग

संजीवनी पाटील म्हणाल्या की, ‘आमचा दुसरा सीझन व्यवस्थित झाला. पण, कसंय प्रत्येकाला पोटही असतं. मी याआधी सुद्धा एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट सांगितली होती. मला अडीच हजार मिळत होते. जेव्हा लोकांना आता मी ही गोष्ट सांगते, तेव्हा त्यांचं असं होतं, काय सांगताय? संपूर्ण मालिका अडीच हजारात केलात? पण, मी सुद्धा काहीच बोलले नाही. तिसऱ्या सीझनला मात्र असं वाटलं की, मला थोडेतरी पैसे वाढवून द्या. आता मी माझंच सांगत नाहीये. पण, मालिकेतल्या ज्या तीन-चार भूमिका गाजतात. त्यामुळे चॅनेल, प्रोडक्शन जसं मोठं होतं. त्याचप्रमाणे कलाकाराचा सुद्धा विचार करा. पाचशे-हजार रुपये वाढवून दिल्यानं काय फरक पडला असता? मी अडीचच्या पुढे साडेतीन-चार हजार मागितले. मग त्यावरून थोड्या गोष्टी झाल्या. त्यांनी नंतर मला पाचशे-सातशे रुपये वाढवून दिले.’

‘माझं असं झालं पाचशे-सातशे रुपयांसाठी मी भीक का मागतेय? बरं, तिसरा सीझनही चालला नाही. या सगळ्यादरम्यान आणखी एक गोष्ट झाली होती, ती म्हणजे अपूर्वा नेमळेकरने मालिका सोडली. तिच्याही काही गोष्टी होत्या. आता आमचं चॅनेलशी बिनसलं वगैरे असं बोलता येणार नाही, तेव्हा समजूतदारपणा गरजेचा होता. मी सुद्धा वच्छीच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत केली होती. माझे सीनही उन्हात असायचे, घरात सीनही नव्हते. मी टॅनही झाले होते. मला आठवतंय, मी एकाच दिवशी 21 सीन केले होते. छोटे-मोठे काहीही असो मी 21 सीन केले. त्यानंतर मी आजारीही पडले होते. पण, मी असं म्हणत नाही की, या गोष्टींकडे लक्ष द्या, मला विचारा. मात्र, थोडा समजूतदारपणा दाखवला पाहिजे होता. कारण, वच्छी सुद्धा तेवढीच महत्त्वाची होती.’

‘अभिनेत्री म्हणून वाईट नव्हते, माणूस म्हणून वाईट नव्हते. मग, कलाकार म्हणून ते माझ्याशी असं का वागले? एखाद्या कलाकाराला काहीच येत नसतं तरीही 1200-1500 रुपये पर डे दिले जातात. माझं पात्र त्या मालिकेत जाणीवपूर्वक मारलं गेलं. त्या भूमिकेची लोकप्रियता एवढी होती, मला पुरस्कारही मिळाला होता. पण, पैसे मागितल्यावर मी डोईजड झाले. बरं या सगळ्यात दिग्दर्शकाचा संबंध नाही. ते खूप चांगले होते, चॅनेल वाल्यांचं म्हणणं सुद्धा मला माहिती नाहीये. शेवटी तो तिसरा सीझन चाललाच नाही. तिसऱ्या सीझनसाठी मी स्वामी समर्थ मालिकाही सोडली होती. मला त्याचा पश्चाताप होतो.’

‘मालिका सोडताना तुला कसं काम मिळतंय बघू असं बोललं गेलं. त्यांचे ते शब्द खरेही ठरले. मला काम मिळत नव्हतं. ‘अबोली’ मालिका करताना तेथील एकजण आणि ‘रात्रीस खेळ चाले’चे निर्माते हे दोघंही मित्र होते. त्यामुळे, तिथेही वाईट अनुभव आला. मी मग मालिकांमध्ये कामच केलं नाही. आता मी सिनेमे करते. याशिवाय माझ्याकडे माझं कुटुंब आहे. मी त्यांच्याबरोबर वेळ घालवते आणि कलावती आईंचं नामस्मरण करते. मी माझ्या आयुष्यात आता आनंदी आहे.’ असं संजीवनी यांनी शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी”ला दिलेल्या मुलाखतीत संजीवनी पाटील बोलत होत्या.

Follow Us
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...